रत्नागिरी : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ अन्वये कलम ४ नुसार ज्या कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या आस्थापनेतील अंतर्गत समिती गठीत केल्याची नोंद केंद्र शासनाच्या “शी बॉक्स पोर्टल” (SHE BOX PORTAL) वर करण्याबाबतचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ज्या खासगी आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत समितीचे गठन करावे. त्यासाठी https://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवर private head office registration या टॅब वर क्लिक करा. आवश्यक त्या सर्व माहितीचा अचूक तपशील भरून सबमिट या टॅब वर क्लिक करून माहिती नोंदवावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय कुलकर्णी कंम्पाऊंड, जेल रोड, बीएसएनएलच्या बाजूला, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:36 PM 08/May/2025














