खेड : मध्य रेल्वे प्रशासनाकडून चालवण्यात येत असलेल्या एलटीटी करमळी वातानुकूलित साप्ताहिक स्पेशलच्या फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे दि. २४ मे पर्यंत स्पेशलच्या फेऱ्या धावणार आहे. ०१०५१/०१०५२ क्रमांकाची एलटीटी -करमाळी वातानुकूलित साप्ताहिक स्पेशल दर शुक्रवारी धावते.
एलटीटीहून रात्री १०:१५ वाजता सुटणारी ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी १२:०० वाजता करमाळीला पोहचत आहे. परतीच्या प्रवासात शनिवारी दुपारी २:३० वाजता करमाळीहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०५ ला एलटीटीला पोहोचते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:54 PM 10/May/2025
