रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-बावनदी येथे १६ चाकी टँकर पलटून अपघात झाला. टँकरच्या डिझेल टाकीने पेट घेतल्यामुळे टँकरचे मोठे नुकसान झाले. अपघाताची ही घटना गुरुवार ८ मे रोजी रात्री ९.३० वा. सुमारास घडली.
हा १६ चाकी टँकर जयगड येथून पावडर भरुन इंदोरकडे जात होता. तो निवळी बावनदी येथे आला असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यामुळे तो रस्त्याच्या कडेला जा ऊन उलटून हा अपघात झाला. टँकर उलटल्यामुळे टँकरच्या डिझेल टाकीने पेट घेतल्यामुळे जवळपास अर्धा टँकर आगीच्या विळख्यात आल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 10/May/2025
