चिपळूण : एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत प्रकल्प-२ मध्ये चिपळूण तालुक्यातील १६ ठिकाणी अंगणवाडी मदतनीस पदे रिक्त आहेत. या पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यातील मजरेकाशी उर्दु, कोल्हेखाजण, वीर-देवपाट, वारेली, वहाळ मोरेवाडी, खांडोत्री बौद्धवाडी, पिलवली तर्फे वणगे, कुटरे चिंचवाडी, येगाव पाखाडी, येगाव ढोगबाव, येगाव भुवडवाडी, दुर्गेवाडी धुमककोंड, कोकरे ओझरवाडी, कोकरे बुदरवाडी, रावळगाव सुर्वेवाडी या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस पदे रिक्त असून ती लवकरच भरली जाणार आहेत. इच्छुकांनी या बाबत बालविकास प्रकल्प अधिकारी पी. पी. शिगवण यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 10/May/2025
