गुहागर : गुहागर तालुक्यातील काजुर्ली आडीवाडी येथील एक वीज खांब खालच्या भागातून पूर्णतः सडला आहे. हा वीज खांब कोसळण्याच्या स्थितीत असल्याने त्याला लाकडी खांबाचा आधार देऊन बांधण्यात आले आहे. हा खांब तातडीने बदलावा अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता (चिपळूण) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काजुर्ली आडीवाडी येथील लोखंडी वीज खांब हा खालच्या बाजूने जमिनीजवळ सडलेला असल्यामुळे ग्रामस्थांनी वीज खांब लाकडी खांबाने बांधून ठेवलेला आहे. पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो. त्यामुळे या ठिकाणी नवीन वीज खांब बसवणे गरजेचे आहे. या ठिकाणी एखादा अपघात घडल्यास त्याला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ जबाबदार राहील असे पत्रात नमूद केले आहे. हा धोकादायक वीज खांब तातडीने बदलावा, अशी मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी कार्यकारी अभियंता चिपळूण, उप अभियंता गुहागर, शाखा अभियंता आबलोली यांना दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 10/May/2025
