पावस परिसरात आंबा विक्रीतून लाखोंची उलाढाल

पावस : पावस परिसरामध्ये समाधी मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सुट्टीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू झाल्यामुळे स्थानिक आंबा विक्रेत्यांच्या व्यवसायाला चांगली चालना मिळाली आहे. खात्रीशीर रत्नागिरी हापूस आंबा सहजगत्या उपलब्ध होत असल्यामुळे आठवडाभरात या परिसरात पर्यटकांच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल झाली आहे.

मुंबई पुणे सारख्या अनेक शहरांमध्ये हापूस आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र अनेक भागातून हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध होत असतो त्यामुळे तो नेमका कुठल्या भागाचा आहे याची खात्री देता येत नाही.

त्यामुळे ग्राहकांची फसगत होते या पार्श्वभूमीवर पावस येथील समाधी मंदिर परिसरात बागातदारांकडून आंबा विक्रीसाठी उपलब्ध होत असल्यामुळे तसेच दलालीची कोणतीही प्रक्रिया नसल्यामुळे ग्राहकांना थेट आंबा खरेदी करता येतो त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे पर्यटक आपोआप या विक्रेत्यांकडे वळत असतात. गेल्या आठवड्याभराच्या गर्दीच्या माध्यमातून सुमारे एक लाखापेक्षा जास्त आंब्याची विक्री झाली आहे. यावर्षी हापूस आंब्याचा हंगाम कमी असल्यामुळे दर अवाक्यामध्ये आहेत त्यामुळे यावर्षी सुरुवातीपासून दर स्थीर आहे त्यामुळे बागातदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

थेट विक्रीमुळे दरवर्षी चांगला प्रतिसाद
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथील आंबा बागातदार प्रशांत पाडळकर म्हणाले की, हे पूर्वी हापूस पुणे-मुंबई बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवत होतो परंतु खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे व्यवसाय अडचणीचा ठरत होताअखेर तीन वर्षापूर्वी या ठिकाणी आंबा व्यवसाय करण्यास सुरुवात केली आणि दररोज बागेमध्ये तयार होत असलेला आंबा थेट ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करू शकलो, त्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला ग्राहक स्वतःहून भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आंब्याच्या गुणवत्तेविषयी खात्री देतात, आंब्याची गुणवत्ता व त्यांच्यासाठी निर्माण केलेला विश्वास या जोरावर आम्ही थेट आंब्याची विक्री करून व्यवसाय करत आहोत, त्याला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 10/May/2025