गेले सलग तीन दिवस कोकणात प्रत्येक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे व सकाळच्या सत्रात पाऊस मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान होत आहे.
आंबा पीक वाऱ्यामुळे आंबा जमिनीवर आल्यामुळे पीक हातात येण्यापूर्वीच नुकसान झाल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
बुधवार दि. ७ ते शुक्रवार दि. ९ मे या कालावधीत जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला आहे. विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.
रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, गुहागर, चिपळूण तालुक्यात हजेरी लावली. पावसामुळे आंबा पिकण्याऐवजी खराब होण्याचा धोका अधिक आहे.
शिवाय जोराच्या वाऱ्यामुळे आंबा टिकत नसून जमिनीवर पडला आहे. जमिनीवर पडलेला आंबा खराब झाल्याने बागायतदारांना फटका बसला आहे.
अद्याप निर्यात सुरू
मुंबई बाजारपेठ येथून अद्याप आंब्याची परदेशी निर्यात सुरू आहे. युद्धामुळे अद्याप निर्यातीवर परिणाम झाला नसल्याचे नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 10-05-2025
