खेड : मुलाकडून वडिलांवर अॅसिड हल्ला

खेड : खेड तालुक्यातील खालचीवाडी, सुसेरी येथे एका धक्कादायक घटनेत वडिलांवर त्यांच्या स्वतःच्या मुलाने अॅसिड टाकल्याची घटना घडली आहे. ही घटना ५ मे २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात दि. १० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल हिरू देवळेकर (वय ६२, रा. सुसेरी नं. २, खालचीवाडी) हे सेवानिवृत्त असून, त्यांचेच पुत्र मंगेश अनिल देवळेकर (वय २३) याने घरात असताना त्यांच्यावर शिवीगाळ करत अचानक अॅसिड फेकले. या हल्ल्यात अनिल देवळेकर यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर, ओठांवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. उपचार घेतल्यानंतर उशिराने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 12/May/2025