Breaking : रत्नागिरीत भाजपा बंडाच्या तयारीत; बाळ माने पक्ष सोडणार

त्नागिरी : रत्नागिरी विधासभा मतदारसंघ भाजप च्या वाट्याला नसल्याने रत्नागिरीकरांच्या हिताकरिता मला अन्य पक्षात जावे लागत आहे असे सांगत भाजप चे माजी आमदार बाळ माने यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. आज रत्नागिरीत झालेल्या पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे यांच्यासोबत सुमारे ६० ते ७० पदाधिकारी उपस्थित होते. अन्य पक्ष माला स्वीकारायला तयार आहे असे म्हणत त्यांनी उबाठा मध्ये जाण्याचे संकेत दिले. मी तुमच्यातून गेलो तरी परका वाटणार नाही, असे सांगितल्यानंतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भावना आवरता आल्या नाहीत. काही महिला पदाधिकारी यांना रडू कोसळले आणि सर्वांनी आम्ही तुमच्यासोबत असून माने यांना विश्‍वास दिला. आता बाळासाहेब माने यांनी इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकंदर विधानसभा उमेदवार जाहीर होण्याआधीच रत्नागिरीत भाजप ने बंड पुकारल्याचे दिसत आहे.