मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’चा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
ही परीक्षा होऊन अडीच महिने उलटून गेले तरी निकालाबाबत अधिकृत घोषणा नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.
संयुक्त पूर्व परीक्षेअंतर्गत सहायक कक्ष अधिकारी (५४ पदे), राज्य कर निरीक्षक (२०९ पदे) आणि पोलिस उपनिरीक्षक (२१६ पदे) अशा एकूण ४७९ पदांसाठी ही भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ही परीक्षा मूलतः ५ जानेवारी २०२५ रोजी होण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव ती पुढे ढकलून २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली. परीक्षेनंतर तीन दिवसांनी ५ फेब्रुवारीला पहिली उत्तरतालिका, तर ४ मार्चला दुसरी उत्तरतालिका जाहीर झाली. उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर एका महिन्याच्या आत निकाल लागणे अपेक्षित असते.
एकीकडे गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल रखडला असतानाच गट क ची परीक्षा येत्या १ जून रोजी होती आहे. गट क ची परीक्षा जवळ आली असताना गट ब चा निकाल रखडल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 13-05-2025
