चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलचे उद्घाटन

रत्नागिरी : मांडकी पालवण (ता. चिपळूण) येथील चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलचे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उदघाटन झाले.

ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी हे हॉस्पिटल काम करील व सुदृढ पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करील, असा विश्वास यावेळी सामंत यांनी व्यक्त केला.

डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या माध्यमातून होणारे हॉस्पिटल रत्नागिरी जिल्ह्याच्या वैभवात भर घालील हा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. स्वच्छ व शिस्तबद्धता हा चोरगे सरांचा गुणधर्म आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे असेही यावेळी त्यांनी सांगितले.

अतिशय मोठी दूरदृष्टी ठेवून चोरगे सरांनी आपल्या भागात अनेक संस्था चालू केल्या व या भागातील नागरिकांच्या भवितव्यासाठी काम केले आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा होईल, असा विश्वास मला असून हे हॉस्पिटल रुग्णसेवेत एक आदर्श निर्माण करून देईल, असाही विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 13-05-2025