रत्नागिरी : जिल्ह्यात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

रत्नागिरी : भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमेदिवशी झाल्याने हा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरी तसेच ग्रामीण भागातील बुद्धविहारांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बुद्ध विहार व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भगवान गौतम बुद्ध यांनी दया, करुणा, अहिंसा, आध्यात्मिक शांती यांची शिकवण दिली. त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला. गौतम बुद्धांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी बुद्ध विहारांतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावागावांतून सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 13/May/2025