खेड तालुक्यातील सहा गावांचे विंधन विहिरींसाठी साकडे

खेड : तालुक्यातील दुर्गम भागातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी कार्य करणाऱ्या जल फाउंडेशन कोकण विभाग संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव यांच्याकडे तालुक्यातील ६ गावांतील ग्रामस्थांनी विंधन विहिरीसाठी साकडे घातले आहेत.

तसेच ३ गावांनी साठवण टाक्यांची मागणी केली आहे. जल फाउंडेशनच्या माध्यमातून बहिरवलीतील सामाजिक कार्यकर्ते खालीद चौगले व मुंबई महाराष्ट्र विद्यालय पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 13/May/2025