रत्नागिरी : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो.
प्रवेशासाठी ७०२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. पैकी ५४६ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. ३१ अर्ज बाद करण्यात आले आहेत. १२६ पालकांनी संपर्कच न साधल्यामुळे या जागेवरील प्रवेश रिक्त राहिले आहेत.
जिल्ह्यात आरटीईच्या ७८२ जागा असून प्रवेशासाठी ७०२ विद्यार्थ्यांची निवड झाली होती.
चौथ्या फेरीनंतरही १२६ जागा रिक्त
निवड झालेली असतानासुद्धा १२६ पालकांनी संपर्क साधला नाही. त्यामुळे या जागेवरील प्रवेश रिक्त आहेत.
आरटीई प्रवेशासाठी निवड होऊनसुद्धा १२६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळांकडे संपर्कच साधलेला नाही. ३१ विद्यार्थ्यांचे अर्ज मात्र बाद झाले होते. आतापर्यंत ५४६ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत- बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 14/May/2025













