नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित ५९ वी महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा उदय कदम हिने मुंबईच्या मिताली पाठक वर १७-१४, २५-०२, २५-०१ अशा तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात मात करून महिला गटाचे विजेतेपद पटकाविले.
ही स्पर्धा १० मे ते १३ मे या कालावधीत रोजी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, सेक्टर १A, MGM हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई येथे झाली. आकांक्षा कदम हिने मिळवलेल्या या यशाबद्दल उद्योग व मराठी भाषा मंत्री, तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार सुचय अण्णा रेडीज, अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सचिव मिलिंद साप्ते व खजिनदार नितीन लिमये आणि सर्व जिल्हावासियांनी अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 14/May/2025














