चिपळूण : शहर व खेर्डी येथील महापुरास कारणीभूत ठरणारा, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख येथील वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन पूल अखेर इतिहास जमा झाला आहे. गेले चार महिने सुरू असलेले या भागातील दोन्ही जुने पूल तोडण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे.
यामुळे आता वाशिष्ठी नदीचे पाणी वेगाने प्रवाहित होणार आहे. हा पूल पाडण्यासंदर्भात माजी नगरसेवक अरुण भोजने यांच्यासह काहींनी पाठपुरावा केला होता. बहादूरशे येथील हा पूल शंभर वर्षांपूर्वी बांधलेला ब्रिटिशकालीन पूल होता.
हा पूल मातीच्या बंधाऱ्यावर ८० टक्के बांधलेला होता. त्यामुळे १२५ मिलिमीटरच्या पुढे पाऊस पडला की या पुलास पाणी अडतं आणि ते संपूर्ण खेर्डी-कळंबस्ते आणि चिपळूण शहरात पसरतं आणि पूर येत असे. दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात वाशिष्ठी नदीवर नवा पूल बांधण्यात आल्यानंतर जुना पूल महापुरास कारणीभूत ठरत असल्याने तो तोडण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडन सुरू झाली होती
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 14/May/2025













