माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीत, कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे शेतकरी मेळावा घेण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, कृषी सहायक भानुदास दौंड यांनी उपस्थित राहत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेती संदर्भातल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या. भात कापणीनंतर शेतात हिवाळी पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच शेखर उकार्डे, उपसरपंच मंगेश मांडवकर, सदस्य सुनील घडशी, प्रिया सुवरे, पूर्वा भुवड, दामिनी विभूते, शरद जाधव, सुप्रिया सुतार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच शेखर उकार्डे यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 11/Oct/2024