चिपळुणात ११ पूर प्रभावित क्षेत्र, पाच दरडग्रस्त भागांवर राहणार अधिकाऱ्यांची करडी नजर

चिपळूण : पावसाळ्यातील आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने एक महिना अगोदरच उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये २४ तास नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे तसेच पूरप्रभावित क्षेत्र व निवारा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यावर्षी शहरातील ११ पूरप्रभावित क्षेत्र आणि ५ दरडग्रस्त भागांवर अधिकाऱ्यांची करडी नजर असणार आहे. आपत्कालीन पूरपरिस्थितीत फायबर बोटी, यांत्रिक बोटी आदींसह मदतकार्यातील साहित्यदेखील सज्ज ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पालिका प्रशासन सज्ज असणार आहे.

पूरप्रभावित क्षेत्र निश्चित
चिपळुणात २२ व २३ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला होता. महापुरात चिपळूण नगरी उध्‌वस्त झाल्याने येथील नागरिकांना मोठा फटका बसला होता. ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रशास्स्कीय स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये चिपळूण पालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो. यामध्ये चिपळूण शहरातील बाजारपेठ भाग, पेठमाप, गोवळकोट, शंकरवाडी, मार्कडी, चिंचनाका वडनाका परिसर, एसटी स्टैंड, पागमळा परिसर आदी ११ पूरप्रभावित क्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत तसेच खेड, कांगणेवाडी ओहारवाडी,, मतेवाडी, गोवळकोट हे भाग दरडग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असून, या भागांवर विशेष लक्ष राहणार आहे.

चिपळूण पालिकेत नियंत्रण कक्ष
पालिकेत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आले आहे. पालिका कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक एकत्रित संकलित करण्यात आले आहेत. १ जून २०२५ पासून पालिका कर्मचाऱ्यांची दीर्घकालीन रजा व मुख्यालय सोडण्यास येऊ नये, याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आदेश काढण्यात आले. आहेत. आस्थापनेवरील कर्मचारी यांची आपत्कालीन कक्षामध्ये रात्रपाळीकरिता नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पालिका हद्दीमधील पोहणाऱ्या युवकांची यादी तयार करण्यात आली आहे. ज्या वेळी पूरपरिस्थिती शहरामध्ये असते त्या केली या युवकांनी दूरध्वनीवरून सतर्क राहण्याचे सांगण्यात येते.

शहरात त्यावेळी भोंगा वाजणार
शहरामध्ये पाणी भरण्यास सुरवात होते या वेळेस सावधानतेचा इशारा म्हणून पालिका कार्यालयामधून भोगा वाजवण्यात येतो. शहरातील महत्त्वाच्या सात ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, पाण्याच्या पातळीबाबत नियंत्रण कक्षामध्ये त्याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

जंतुनाशक औषधांची खरेदी
आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुमित जाधव यांच्यामार्फत पावसाळ्यात साथरोग पसरू नये यासाठी आवश्यक खबरदती घेण्यात आली आहे. याच अनुषंगाने जंतूनाशक फवारणीस्टठी लागणारी औषधे व कचऱ्यावर फवारणीसाठी लागणारी जंतूनाशक पावडर तसेच द्वास निर्मुलनास्यठी आवारक औषधे खरेदी करण्याचावतची कार्यवाही सुरु आहे. आरोग्य कर्मचारी शहरात ७ हजार पत्रके वाटप करून पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी याची जनजागृती करणार आहेत. पाण्यातून कोणते आजार पसरू नयेत यासाठी अभियंता रोहित खाडे यांनीही चिपळूण शहरातील खेर्डी व गोवळकोट येथील दोन्ही ठिकाणचे फिल्ट्रेशन प्लांट कार्यान्वित केलेले आहेत.

सर्व प्रभागासाठी नऊ पथके तैनात
पूर्वतयारी म्हणून नगर पालिकेने सर्व प्रभागात एकूण नऊ पथके तयार करण्यात आल्ये आहेत. त्यामध्ये एका जबाबदार अधिकाऱ्यासह पथक तपार करण्यात आले आहे. पाच ठिकाणी निवाराकेंद्र, नैसर्गिक आपत्तीकाळात नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी शहरात पाच ठिकाणी निवाराकेंद्र स्थापन करण्यात आली आहेत, यामध्ये नवकोकण एज्युकेशन सोसायटी येथे ४०० कैपेसिटीचे, सह्याद्री शिक्षणसंस्था पाग येथे २०० कैपेसिटीचे, ओझरवाडी शाळा येथे १५० कैपेसिटीचे, कै. बाळासाहेब माटे सभागृह येथे ३०० कैपेसिटीचे तर पाटीदार सभागृह कापसाळ येथे ४०० कैपेसिटीचे निवारा केंद्र असणार आहे.

दहा ठिकाणी ‘पब्लिक अॅड्रेस सिस्टीम’

आपत्कालीन परिस्थितीमध्ये शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी शहरातील चिंचनाका कृष्णाजी कॉम्प्लेक्स, बाजारपेठ गांधीचौक, पेठमाप कमलकुंज बिल्डिंग, गोवळकोट रोड सॉ मिल शेजारी, गोकळकोट रोड कमानीजवळ, उक्ताड गणपती मंदिर गोरिकले बिल्डिंग, खेंड भेंडीनाका अलिना अपार्टमेंट, एसटी स्टैंड मनोहर आकेंड बिल्डिंग गुलमोहर हॉटेल शेजारी, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ, पूर्व विभाग सोसायटीजवळ काविळतळी येथे पब्लिक अॅड्रेस सिस्टिम तर गोवळकोट किल्ला पाण्याची टाकी, पेठमाप समाजमंदिर, शंकरवाडी समाजमंदिर, लोकमान्य टिळक वाचनालय येथे भोंगे बसवण्यात आलेले आहेत.

महापूर थांबवणे आपल्या हाती नाही; मात्र शहरात पाणी भरणार नाही. भरलेच तर नागरिकांचे फार मोठे नुकसान होणार नाही. याची काळजी घेण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून महिन्यापूर्वीच उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. पालिकेच्या कामाबाबत नागरिकांनी सूचना केल्या, तर योग्य सूचनांचे स्वागत करू. – विशाल भोसले, मुख्याधिकारी, चिपळूण पालिका

फायबर होडी, लाईफ जॅकेटसह साहित्य
पालिकेकडे १२२ लाईफ जॅकेट, १८ रबरी ट्यूब, १०१ बोये, १५ चार्जिंग बॅटरी, ५ इलेक्ट्रॉनिक सायरन, ७ मेगाफोन, १५ वॉकीटॉकी सेट, १ सेंटिलाईट फोन यांसह ससी बंडल, बल्ले, करवत, कोयती, पारई, कटावणी, घन, घमेली, फावडी, लोखंडी काटे, हातोडी, शिड्डी, रेस्क्यू कॅन, हॅण्ड लेड टॉर्च, स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी आदी साहित्य उपलब्ध आहे. हे साहित्य नागरिक व संस्था यांच्यासाठी १४ प्रभागात देण्यात आले आहे. आपत्कालीन पूरपरिस्थितीत पालिकेच्या ४ यांत्रिक फायवर बोटी व २ भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत, अशा ६ बोटी उपलब्ध आहेत तसेच नगर पालिकेच्या विगरयांत्रिक होडी ५ उपलब्ध आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून काही बचाव साहित्य प्राप्त आहेत.

मॉन्सूनपूर्व कामांना वेग
चिपळूण शहरामध्ये पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी एकूण १७कि. मी. लांबीचे पन्हे असून, ते जेसीबी मशिनने खोदाई व सफाई करण्यात आली आहेत, ज्या ठिकाणी मशिन जाऊ शकत नाही त्या ठिकाणी सफाई कामगारांकडून साफसफाई केलेली आहे. गटारे व नालेमधून पाणी वाहण्यास पाण्याच्या प्रवाहाला विरोध व अडथळा होणारे, सार्वजनिक जागेवरील प्लास्टिक, कपडा, झाडांची पाने, झुडपे काढून सांडपाणी निचरा होण्यासाठी साफसफाई करण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी काम सुरू आहे. शहरातील पन्हे व गटारसफाईचे काम २५ एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे. सर्व पऱ्हे साफ करण्यास सुरुवात करण्यात आली असून, सदरचे साफसफाईचे काम पूर्ण झाले आहे. तसेच उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील धोकादायक झाडे व फांद्या तोडण्याचे कामही सुरू आहे.

चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
महापुरात शहरातील नागरिकांच्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावर्षी हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ४ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये गोवळकोट जलशुद्धीकरण केंद्र, आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालय खेड, डीबीजे कॉलेज मैदान, खेड-गुहागर बायपास रोड या ठिकाणांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 15/May/2025