चिपळुणात आज ज्योतीकलश यात्रा

चिपळूण : गायत्री परिवाराचे संस्थापक पं. श्रीराम शर्मा आचार्य यांनी उपासना करताना स्थापन केलेल्या अखंड दिव्याला १०० वर्षे पूर्ण होत असून, त्यांच्या आध्यात्मिक कार्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच त्यांच्या पत्नी भगवती शर्मा यांची जन्मशताब्दी २०२६ ला होत आहे. त्या प्रीत्यर्थ चिपळुणात १६ मेपासून ज्योतीकलश यात्रा येणार आहे. या कलशाचे दर्शन अवश्य घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज, हरिद्वार शाखा चिपळूणद्वारे या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योतीकलश यात्रेचे उद्घाटन शुक्रवारी (ता. १६) सकाळी ११०३० ते १२ वाजता पॉवरहाऊस येथे शुभदा जोशी यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी (ता. १७) सकाळी ९ ते १२ वाजता श्री राधाकृष्ण देवस्थान ट्रस्ट घाणेखुंट गवळीवाडी येथे गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ला भार्गवराम मंदिरात सकाळी ९ वाजता गायत्री महायज्ञ होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 16/May/2025