राजापूर नगर वाचनालयात १३ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन

राजापूर : येथील नगर वाचनालयाच्या वतीने १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नगर वाचनालय सभागृहात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार वितरण व नाटक, मालिका अभिनेत्री, नृत्यांगना निवेदक, लेखिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कवी प्रमोद जोशी व कमर्शिअल आर्टीस्ट राहुल कुळकर्णी यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी वाचक, सभासद व वाचनप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगर वाचनालय कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 11/Oct/2024