Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) नावाखाली फसवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली तब्बल २५०० फ्रॉड बँक खाती उघडून त्यातून लाखो रुपयांचे व्यव्हार झाल्याची घटना समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या घरातील पुरुषांच्याही कागदपत्रांचा वापर करुन सायबर गुन्हे केले आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर प्रशासनाला जाग आहे. महिला व बालविकास विभागाने अर्जाची पडताळणी काटेकोरपणे करण्याचा निर्णय घेतला आहे. (Ladki Bahin Yojana)
लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी (Ladki Bahin Yojana)
लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी नियमाबाहेर जाऊन अर्ज केले आहेत. या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरु आहे. परंतु लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली खूप फसवणूक होत आहे. त्यामुळे हे काम युद्धपातळीवर सुरु करण्याचे आदेश जिल्हा महिला विभागांना देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या महिलांना नियमांचे पालन केले नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत.
लाडकी बहीण योजनेत तब्बल २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले होते. यातील काही महिलांचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नव्हते. त्यामुळे पडताळणी केली जात होती. लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन ही पडताळणी केली जात होती. त्यानंतर आता पात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे, असं महिला विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana)
मार्च महिन्यात तब्बल २ कोटी ४७ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यात आले आहेत. यातील अजूनही काही महिला निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे आता पुन्हा काटेकोरपणे पडताळणी करण्यास सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी पुरुषांची कागदपत्रे घेऊन केवायसी करुन बँक खात्यात व्यव्हार करण्यात आले. याचसोबत महिला व पुरुषांचे नाव जर सारखे असेल तर त्या पुरुषांनीही योजनेचा लाभघेतला असल्याचे नाकारता येत नाही. (प्रितम हे महिला आणि पुरुष दोघांचेही नाव असू शकते) यामुळे आता योजनेची काटेकोरपणे पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले. (Ladki Bahin Yojana)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 16-05-2025
