Ratnagiri : ‘त्या’ १३ जणांची बांगलादेशात रवानगी

रत्नागिरी : तालुक्यातील निरुळ येथील चिरेखाणीवर आढळून आलेल्या आणि भारतामध्ये बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांची बांगलादेशात रवानगी करण्यात आळी आहे. न्यायालयाने त्यांना ठोठावलेली ६ महिन्यांची शिक्षा १४ मे रोजी संपल्यानंतर लगेच ही कार्यवाही करण्यात आली.

भारत- बांगलादेशाच्या बॉर्डरवरील सुरक्षा यंत्रणेच्या (बीएसएफ) ताब्यात त्यांना दिले जाणार आहे. ते या नागरिकांना बांगलादेशाच्या स्वाधीन करणार आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला ११ नोव्हेंबेर २०२४ एक माहिती मिळाली होती. पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत आहेत. त्याआधारे पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले होते.

याप्रकरणी न्यायलयाने त्यांना सहा महिने साधी कैद आणि ५०० रुपये दंड ठोठावला होता. त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली काल स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांना घेऊन रवाना झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 17/May/2025