आजचे राशीभविष्य, १९ मे २०२५

मेष – आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार – विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल.

वृषभ – आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्या कडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल.

मिथुन – आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल.

कर्क – समृद्ध जीवनशैली व मनोरंजक वृत्ती ह्यामुळे आज आपण आनंदी राहाल.

सिंह – आज आपले मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल.

कन्या – आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संतती विषयी चिंता लागून राहील.

तूळ – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव जाणवेल.

वृश्चिक -आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल.

धनु – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील.

मकर – आज सकाळी आपले मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल.

कुंभ – आज मन व शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण – घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे.

मीन – आज अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 19-05-2025