संगमेश्वर बसस्थानकात पाणीच पाणी; महामार्गावरील कामाचा फटका

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका संगमेश्वर बाजारपेठेला बसला आहे. रस्त्याचे काम करताना पाणी जाण्यासाठी मार्गच न ठेवल्यामुळे गेले दोन दिवस कोसळत असलेल्या पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. हे पाणी काहींच्या दुकानातदेखील शिरले. या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पाणी वाढत गेल्यानंतर ठेकेदाराने जेसीबीद्वारे पाणी जाण्यासाठी मार्ग काढला त्यामुळे अनुचित प्रकार टळला.

गेले दोन दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. संगमेश्वर तालुक्यालाही पावसाचा तडाखा बसला आहे. अजूनही पावसाचा जोर सुरूच आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी संगमेश्वर बाजारपेठ येथे व्यवस्थाच केलेली नाही. डोंगरउतारावरून धो-धो वाहत येणारे पाणी महामार्गांवरून थेट बसस्थानकात शिरले. आजपर्यंत कधी नव्हे तो अचानक पाण्याचा प्रवाह आल्यामुळे एसटी बसच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासीही भयभीत झाले होते.

बसस्थानक तसेच देवरूख मार्गावर पाणीच पाणी जमा झाले. डोंगरातील पाणी रस्त्याशेजारील दुकानात शिरले. सुदैवाने, उघडीप मिळाल्याने पाण्याचा प्रवाह कमी झाला आणि सर्वकाही पूर्वपदावर आले.

तसेच दुकानदारांसह प्रवाशांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेला चिखल व कचरा दुकानासमोरच पडलेला होता. सलग तिसऱ्या दिवशीही अशीच स्थिती राहिल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. डोंगरावरून चिखलमिश्रित पाणी आणि महामार्गावरून वाहणारे पाणी थेट रस्त्यावर येऊन साचत असल्याने त्यामधून वाहनांना आणि पादचाऱ्यांना मार्ग काढणे कठीण झालेले आहे. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर महामार्ग ठेकेदारांकडून जेसीबीद्वारे पाणी जाण्यासाठी मार्ग काढण्यात आला.

Tata motars tiago

विक्रेत्यांना बसला फटका
पावसाचे पाणी महामार्गावरून थेट बाजारपेठेत आल्यामुळे भाजीमार्केट आणि कोंबडीगल्लीतून जोरदार प्रवाह वाहत होते. रस्त्याला नाल्याचे रूप आले होते. रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना याचा चांगला फटका बसला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 22/May/2025