रत्नागिरी : ‘जीजीपीएस’ प्रशालेत माता-पालक मेळावा

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जीजीपीएस प्रशालेत नवरात्रोत्सवानिमित्त माता पालक मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर यांनी केली.

अॅड. प्रिया लोवलेकर व मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. या वेळी लोवलेकर यांनी मुलींच्या सुरक्षिततेबाबत सूचना व माहिती दिली. या निमित्त श्री सुक्तचे पठण घेण्यात आले. नऊ माता पालकांचा सत्कार करण्यात आला. सोनाली पाटणकर यांनी मुलांशी संवाद कसा साधावा,याबाबत मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 11/Oct/2024