गुहागरात विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान

गुहागर : विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे गुहागर तालुक्यातील भातगाव, पिंपर, हेदवी येथे घरांवर वीज पडून विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातल्या अन्य गावांमध्येही वीज कोसळून नुकसान झाले आहे. मात्र, त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. यावर्षी उन्हाळ्याच्या उकाड्यात पावसाने लवकर हजेरी लावली आहे.

गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक कोसळलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसासोबत विजांच्या कडकडाटाने मोठे नुकसान झाले. मंगळवारी सायंकाळी मौजे भातगाव धक्क्या (गोळेवाडी) येथील श्रीमती वनिता रामचंद्र गावडे यांच्या घरावर वीज कोसळून विजेचे बोर्ड, वायरिंग यांचे नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तसेच पिंपर येथील श्री. सुवर्ण शशिकांत मोरे यांच्या घरावर देखील वीज पडून सगळे विद्युत उपकरणे जळाले आहेत. त्यात कोणतीही जिवीतहानी नाही. हेदवी बेलवाडी येथील नारायण भिकाजी कुवारे यांच्या राहात्या घराजवळील वीज पडल्यामुळे त्यांच्या घरातील विजेची उपकरणे तसेच वायरिंगचे अंदाजे १८ हजारांचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 22-05-2025

Echelon prive