चिपळुणात आज ‘ताजा बाजार भाजी मंडई’ चे उद्घाटन

चिपळूण : शहरातील नामवंत भाजीचे १ व्यापारी सुधीर शिंदे यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दि. १२ रोजी शहरात जुन्या भाजी मंडईच्या बाहेर नातू हॉस्पिटलसमोर स्वतंत्र जागेत ताजा बाजार भाजी मंडई सुरू केली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होलसेल भाजीची विक्री होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली दसऱ्याच्या मुहूर्तावर हा ताजा बाजार सुरू होणार आहे.

भाजीचे व्यापारी सुधीर शिंदे यांनी ताजा बाजारच्या नावाने बायपास रोड येथे एक भाजी मंडईचे दालन उघडले होते. या ताजा बाजार भाजी मंडईलासुद्धा शहर आणि तालुक्यातल्या ग्रामीण भागातील ग्राहकाने उत्तम प्रतिसाद दिला. होलसेल भाजी विक्री आणि माफक दरामध्ये भाजी मिळत असल्याने या ठिकाणी भाजी घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत असे; मात्र मधल्या काही काळात तेथील काही तांत्रिक कारणांमुळे तिथला त्याचा ताजा बाजार भाजी मंडई दुसरीकडे घालवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि याच निर्णयानुसार सुधीर शिंदे यांनी ताजा बाजार भाजी मंडई नावाने जुना स्टॅण्डच्या बाहेर स्वतंत्र जागेत ते पुन्हा ताजा बाजार भाजी मंडई सुरू केली आहे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होलसेल भाजीची विक्री केली जाणार आहे. सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत भाजीचा लिलाव होईल. त्यानंतर सात ते पुढे ११ किंवा १२ वाजेपर्यंत होलसेल भाजीची विक्री केली जाणार आहे. किरकोळ भाजीसाठी फक्त एकच काऊंटर ठेवणार असलेले त्यांनी बोलताना सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 12/Oct/2024