नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करून कोकण रेल्वेच्या स्थानकावर लाल बावटा फडकवत जल्लोष

चिपळूण : कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटनेसाठी झालेल्या रोमहर्षक लढतीत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन एम्प्लॉइज युनियनचा ३४२ मतांनी पराभव करत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एनआरएमयूने बाजी मारताच कोकण रेल्वेमार्गावरच्या सर्व स्थानकावर लाल बावटा फडकवत जल्लोष केला.

कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी केआरसी त्याचसोबत संघटनाविरोधात अन्य संलग्न एनआरएमयू अशी थेट लढत झाली. बुधवारी यासाठी मतदान झाले. एनआरएमयू संघटनेचे नेते वेणू. पी. नायर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीची जबाबदारी कुमार घोसाळकर, सचिन दिवेकर, रमाकांत नाडकर्णी, संजय गुजर यांनी स्वीकारत विरोधी संघटना केआरसीचा दणदणीत पराभव केला. ५ हजार २४९ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार ७९६ कर्मचाऱ्यांनी मतदान केले. त्यापैकी एनआरएमयूला २ हजार ५५३ मते मिळाली आहेत. तर केआरसीला २ हजार २११ मते मिळाली असून ३४२ मतांनी विजय मिळवला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतून मतदान करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:23 PM 12/Oct/2024