रत्नागिरी : तीन महिन्यांचे धान्य ३० जूनपर्यंत वितरीत करण्याचा निर्णय

रत्नागिरी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत आगामी पावसाळा परिणामी पूर आदी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्ट महिन्यापर्यंतचे धान्य लाभार्थ्याना ३० जूनपर्यत रेशन दुकानांमधून वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार १ जूनपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार पावसाळयामुळे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे एकत्रित धान्य जून महिन्याच्या ३० तारखेपर्यंत जिल्ह्यातील ९५२ दुकानांमधून वितरीत करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून बैठकीत देण्यात आल्या आहेत.

३० तारखेच्या आत दुकानावर जा; ३ महिन्यांचे रेशन उचला
शासनाने तीन महिन्याचे धान्य एकाच वेळी लाभार्थ्यांना वितरीत करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला दिले आहेत. त्यानुसार दुकानदारांनाही सुचना दिल्या आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत दुकानातून धान्य आणावे लागणार आहे.

३ महिन्यांचे धान्य एकत्र
पावसाळ्यात धान्य नेताना लाभार्थ्यांना अडचणीचे होत असल्याने शासनाने तीन महिन्याचे धान्य एकत्रित देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लाभार्थ्यांना जून ते ऑगस्ट असे तीन महिन्यांचे धान्य एकत्र जून महिन्याच्या ३० तारखेपर्यंत न्यावे लागणार आहे.

Shoping fest Khabardar

पावसाळ्यातील प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणा-या अडचणी लक्षात घेऊन, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्टपर्यंतचे धान्य पात्र लाभार्थ्याना ३० जूनपर्यंत रेशन दुकानांमधून वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी जून ते ऑगस्ट असे तीन महिन्यांचे आपल्या हक्काचे धान्य एकत्रित आपल्या रास्त धान्य दुकानांमधून घेऊन जावे- रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 05/Jun/2025