राजापूर : ससाळे, पांगरे शेंबवणे परिसरात गवारेड्याचा वावर

राजापूर : तालुक्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वावर असलेल्या गवारेड्याचा ससाळे, पांगरे, शेंबवणे परिसरात वावर वाढला आहे. आंबा बागायती, शेत शिवारांमध्ये दिवसाढवळ्या गवारेडा दिसू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

पावसाळी हंगामामध्ये करण्यात येणाऱ्या भातशेतांचीही गवारेड्यांच्या कळपांकडून होणाऱ्या नासधुसीने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. तालुक्यातील ससाळे, पांगरे, शेंबवणे आदी भागांमध्ये गवारेड्याचा वावर वाढला आहे.

ससाळे, पांगरे, शेंबवणे आदी भागांमध्ये शेतशिवारासह बागायतींमध्ये अनेकदा गवारेडा दिसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते. काही वेळा दिवसाढवळ्याही आढळून आल्याचे सांगितले जाते. तालुक्यातील भालावली, रुंढेतळी, कशेळी, जुवाठी, कोंड्ये, आडवली, सोल्ये, धाऊलवल्ली, भालावली, वाल्ये, जांभवली, शेजवली, तिवरे, मंदरूळ, करक, पांगरी, मूर, वाटूळ, ओझर, तिवरे आदी भागांमध्ये गवारेड्यांचा कळपाने मोठ्याप्रमाणात वावर असल्याचे याआधी स्पष्ट झाले आहे.

गव्यांच्या संख्येबाबत संभ्रम
तालुक्यामध्ये गव्यांचे नेमके किती कळप आहेत वा त्यांची नेमकी संख्या किती आहे, याचा वनविभागाकडे निश्चित आकडा उपलब्ध नाही. मात्र राजापूर तालुक्यामध्ये सुमारे दहा-पंधरा गवारेड्यांचे कळप आणि सुमारे शंभरहून अधिक गवे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अशी मिळते नुकसान भरपाई
प्रतिगुंठा भात पीक- ३६२ रुपये, नाचणी ३६२, ऊस-५५०, फळझाडे प्रतिझाड : आंबा – ५००, काजू- ५००, नारळ २०००, बांबू प्रतिनग : १० रुपये,

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 09/Jun/2025