महायुतीचे ऐक्य अबाधित राखूनच निवडणुका लढविणार : खासदार सुनील तटकरे

मंडणगड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना महायुती म्हणून सोमोरे जात असताना महायुतीतील तिन्ही घटक पक्षाचा परस्पर समन्वय हा महत्त्वाचा आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची समन्वय समिती याबाबतचे निर्णय पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाने घेणार आहे. निवडणुकीत महायुतीचे ऐक्य अबाधित ठेवूनच निवडणूका लढल्या जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

कोलाड सुतारवाडी येथे पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका यामध्ये भिन्न भिन्न राजकीय परिस्थिती आहे. त्या परिस्थितीचे पक्ष व समन्वय समिती म्हणून अवलोकन केले जाईल. दीर्घकाळानंतर स्थिर सुशासन मिळाले आहे. मतदारांनी टाकेलला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे व राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करण्याची भूमिका आहे.

आठ वर्षांच्या दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ऑक्टोबरमध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचे आकलन करणे गरजेचे आहे. महायुतीचे ऐक्य व सरकाराचे कामकाज हे आमच्या अग्रक्रमाचे विषय असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बोलणे सयुक्तिक
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना तटकरे म्हणाले, राजकारणात प्रत्येक व्यक्ती आपापली भूमिका ठरवत असतात. ते घडल्यानंतर या संदर्भात भाष्य करणे समयोचित ठरेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 09/Jun/2025