चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण नागरिकांच्या सोयीसाठी होत आहे; मात्र, गैरसोय होणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. पाग येथील नागरिकांच्या सोयीच्यादृष्टीने अंडर बायपाससंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी खासदार नारायण राणे चर्चा करत आहेत, तर पालकमंत्री उदय सामंत आणि आम्ही विषयात लक्ष घातलेले आहे. तोपर्यंत अंडरपास आहे, असे गृहीत धरून काम करा, नंतर बदल होतील असे काही करू नका, अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार नीलेश राणे यांनी सांगितले.
आमदार निलेश राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी पाग येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे पाग बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी होत असलेल्या त्रासासंदर्भात निवेदन देऊन कैफियत मांडली. पाग बौद्धवाडी ही वस्ती महामार्गाजवळच असून, येथील नागरिकांची सतत रेलचेल असते व शेकडो वाहने ये-जा करत असतात. अशा परिस्थितीत रस्ता ओलांडणे म्हणजे मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे. नागरिकांना पलीकडे जाणे-येण्यासाठी अंडर बायपास किंवा पर्यायी मार्ग ठेवण्यात यावा, अशी आमची आग्रही मागणी आहे; मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. या विषयात आपण लक्ष घालावे, अशी मागणी पाग येथील नागरिकांनी आमदार नीलेश राणे यांच्याकडे केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 10/Jun/2025














