Maharashtra Weather Update: कोकणात मुसळधार पाऊस; रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट!


Maharashtra Weather Update: राज्यात मान्सून आता जोर धरात असून कोकण, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात मान्सूनने (Monsoon) जोरदार पुनरागमन झाले असून मुंबई, पुणे, अहिल्यानगर भागांतून मान्सून आज (१४ जून) पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे.

(Maharashtra Weather Update)

यासोबतच मुंबई व रायगड, रत्नागिरी ला आज, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्या (जून १५, रविवारी) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणात १४ ते १९ जून, मध्य महाराष्ट्रात १४ व १५ जून, मराठवाड्यात १७ जून, तर विदर्भात १६ ते १९ जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (Rain Update)

राज्यात जुन महिन्याच्या सुरुवातीस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची द्रोणीय रेषा वायव्य राजस्थानपासून मध्यप्रदेश, विदर्भ मार्गे मराठवाड्यापर्यंत गेल्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कोकणात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

शनिवारी आणि रविवारी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

आज मुंबई, रायगड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ जुन रोजी येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कुठे ऑरेंज अलर्ट?

शनिवारी ठाणे, मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह ताशी ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

पावसाचा जोर वाढणार

मान्सूनचा वेग येत्या काही दिवसात आणखीन वाढणार आहे. पुढील काही दिवसांत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभर अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.

ऑरेंज अलर्ट

उर्वरित महाराष्ट्रात १४ ते १७ जुनदरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यात पालघर, ठाणे रायगड , रत्नागिरी सिंधुदुर्ग , पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट , सातारा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 14-06-2025