IRCTC Aadhar Card Verification : तत्काळ तिकीटसाठी IRCTC ला आधार कार्ड लिंक कसं करायचं?

01 जुलैपासून रेल्वेचे तत्काळ तिकीट काढण्यासाठी तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही रेल्वेचं तत्काळ तिकीट बूक करू शकता. तर आज आपण IRCTC आयडीला आपला आधार लिंक कसा करायचा?

याची A To Z प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत…

-सर्वात आधी तुम्हाला गुगलवर IRCTC असं सर्च करून, IRCTC च्या वेबसाईटवर जायचं आहे.

  • त्यानंतर तुमचं आयडी पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगिन करून घ्या.
  • आता तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर जायचं आहे.

-त्यासाठी माय अकाऊंटवर क्लिक करा. त्यानंतर खाली तुम्हाल ऑथेन्टिकेश युजरचा पर्याय आलं असेल.त्यावर क्लिक करा.

-आता तुम्हाला दोन पर्याय मिळतील एक आधार कार्ड आणि दुसरं पॅन कार्ड.. पण आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे.

-इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर टाकायचं आहे. तुमचं नाव आणि जन्मतारीख हे ऑटोमॅटिक फेच झालं असेल..

-त्यानंतर तुम्हाला खाली Verify Details And Received OTP असा ऑप्शन आलं असेल. त्यावर क्लिक करा.

-आता तुमच्या मोबाईलवर आलेलं OTP येथे टाका.. आणि सबमिट करा..

-आता तुमचं आधार कार्ड व्हेरिफेशन पूर्ण झालं आहे.. आता तत्काळ तिकीट बूक करताना तुम्हाला ओटीपी येत जाईल

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 17-06-2025