भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिला आयसीसी रँकिंगमध्ये तिच्या दमदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. स्मृती मानधना पुन्हा एकदा आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये नंबर वन फलंदाज बनली आहे.
2019 नंतर पहिल्यांदाच भारतीय फलंदाज अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हिने ताज्या अपडेटमध्ये 19 रेटिंग गुण गमावले आहेत.
याचा फायदा भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिला झाला आहे.
मंगळवारी जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये स्मृती मानधना हिचे एकूण 727 रेटिंग गुण आहेत.
तिच्यानंतर इंग्लंडची कर्णधार नताली सायव्हर-ब्रंट 719 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
वोल्वार्ड्ट आता 719 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
मानधना नंतर या यादीतील पुढील दोन भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर आहेत. जेमिमा 14 व्या आणि हरमनप्रीत कौर 15 व्या स्थानावर आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:25 17-06-2025
