दापोली कृषी महाविद्यालयातर्फे किन्हळ, सुसेरीत भात बियाण्यांचे वाटप

दापोली : दापोली कृषी महाविद्यालयातर्फे नव्याने दत्तक घेण्यात आलेल्या किन्हळ आणि खेड तालुक्यातील सुसेरी गावात शेतकऱ्यांसाठी ‘भात व भाजीपाला बियाणे वाटप’ हा कार्यक्रम झाला.

आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून शेतीचे फायदे आणि महत्त्व सांगून शेतीचा विकास कसा साधता येईल, याबाबत विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येकाने आपल्या जन्मनक्षत्र आणि राशीनुसार किमान एक झाड लावून त्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 18/Jun/2025

Kore Mobile