रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट!

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. पुढील दोन मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर २५ जूनच्या रात्री ८-३० वाजेपर्यंत उधाण येऊन उंच लाटा उसळणार असल्याची शक्यता भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आयएनसीओआयएस) यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२३ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात ७३.३ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६.४, रत्नागिरी जिल्ह्यात २५.८ मिमी, ठाणे जिल्ह्यात १४.३ आणि कोल्हापूर जिल्ह्यात १३.९ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरीतील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात 9.50 मिमी, खेड 30.85 मिमी, दापोली 11.71 मिमी, चिपळूण 18.44 मिमी, गुहागर 21.20 मिमी, संगमेश्वर 30.75 मिमी, रत्नागिरी 21.44 मिमी, लांजा 31.60 मिमी आणि राजापूर तालुक्यात 27.00 मि मि पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरीत सोमवारी सायंकाळ पासून पावसाचा जोर वाढला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 24-06-2025

Mahrashi karve ANM