दहावी, बारावीची आजपासून पुरवणी परीक्षा

रत्नागिरी : राज्यात मागील फेब्रुवारी – मार्चच्या परीक्षेत कॉपीमुक्तीत आणि निकालात अनुक्रमे प्रथमस्थानी असलेल्या कोकण विभागीय मंडळाची दहावी, बारावीची मंगळवारपासून (ता. २४) पुरवणी परीक्षा सुरू होणार आहे.

परीक्षा कॉपीविरहित होण्यासाठी विभागीय मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

दहावीसाठी १८८ व बारावीसाठी ३९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीची परीक्षा २४ जून ते ८ जुलै आणि बारावीची २४ जून ते १६ जुलै या कालावधीमध्ये घेण्यात येईल. विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी विभागीय मंडळाने दोन भरारी पथके तयार केली आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्य अध्यक्षतेखाली कार्यरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 24-06-2025

Khabardar diwali fest