चिपळुणातील अतिक्रमणावर पालिकेकडून कारवाई

चिपळूण : शहरातील बाजारपेठेत रस्त्यालगतच फेरीवाले विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. वाहतुकीस त्याचा अडथळा ठरत असल्याने तसेच अतिक्रमण करूनही पालिका कर्मचाऱ्यांवर दादागिरी करणाऱ्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच गटारावर बस्तान मांडेलल्या व्यावसायिकांनाही तेथून हटवण्यात आले, तर काही व्यावसायिकांच्या बांधकामाचे शेडही काढण्यात आले. पालिकेच्या वतीने शहरातील बाजारपेठेत सोमवारी (ता. २३) ही कारवाई करण्यात आली.

अर्बन बँकेजवळ काही पानविक्रेते रस्त्यावर ठाण मांडून व्यवसाय करत होते. याबाबत नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. पालिका कर्मचाऱ्यांनी सूचना केली, तरी त्यांनाच उर्मट भाषा वापरली जात होती. त्यामुळे सोमवारी सकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येथील व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले. व्यावसायिकांच्या शेडचे बांधकाम काढण्यात आले.

या भागात अनेक विक्रेत्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पालिकेच्या गटारावरच व्यवसाय थाटला आहे. अशा विक्रेत्यांना कारवाई करत तेथून हटवण्यात आले. यावेळी पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. पालिका कर्मचा-यांशो उद्धटपणे वागणाऱ्यांना सुनावण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 25/Jun/2025

Ratnagiri Khabardar add image