भाट्ये समुद्रकिनारी मुळे काढण्यासाठी गेलेला किरण अद्याप बेपत्ताच

रत्नागिरी : किरण सखाराम जाधव, (३७, रा. राजीवडा, रत्नागिरी) हा ८ जून रोजी सकाळी ११ वाजता भाट्ये समुद्रकिनारी मुळे काढण्यासाठी गेला तो परत आलेला नाही. तो बेपत्ता झाला आहे.

त्याचा रंग सावळा, उंची ५ फुट ५ इंच, डोळे काळे, चेहरा गोल, अंगाने मजबूत, केस डोक्याला टक्कल असलेले, बारीक कापलेली दाढी, शिक्षण ६ वी, डाव्या हातावर किरण नावाचे गोंदण, गळ्यात काळा दोरा, अंगात हिरव्या व पांढऱ्या रंगाचा पट्टा असेलेला टि शर्ट, नेसणीस चॉकलेटी रंगाची हाप पॅन्ट, पायात चप्पल आहे. वरील व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा आढळल्यास शहर पोलिस ठाणे, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा, असे अवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 27/Jun/2025

Tata sierra