रत्नागिरीत २८, २९ जूनला सामाजिक ऐक्य परिषद

रत्नागिरी : रत्नागिरी बहुजन सामाजिक ऐक्य परिषदेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज आणि सी. के. वाले यांची संयुक्त जयंती साजरी करून त्यांचे विचार बहुजन समाजापर्यंत पोहचवण्यासाठी २८ व २९ जूनला बहुजन सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांना जोडण्यासाठी संविधानिक ओळखीचा परिचय करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यासाठी एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी आणि ओपन या संविधानिक ओळखीच्या माध्यमातून लोकांनी एकत्र येऊन आपापले प्रश्न सोडवण्यास साथ सहयोग द्यावा, असे आवाहन बहुजन सामजिक ऐक्य परिषदेचे अशोक भाटकर यांनी केले.

जिल्हा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, भारतात लोकशाही राज्यपद्धती सुरू असून, देश संविधानाप्रमाणे चालतो, असे आपण म्हणतो; परंतु देशातील सध्याची परिस्थिती पाहता मनात प्रश्न निर्माण होत आहेत. त्यासाठी या कार्यक्रमात विविध जातीधर्माच्या, विविध पक्षांच्या, विविध संघटनांच्या लोकांना निमंत्रित केलेले आहे. यातून लोकांना संविधान आणि लोकशाहीचे दुश्मन त्यांचे विभाजन करण्यात यशस्वी झाले आहेत, हे दाखवून देण्याचा हेतू आहे. परिषदेत २८ जूनला कमलाकांत काळे हे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर घेणार आहेत. हा कार्यक्रम माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात सकाळी १० वाजता होईल. २९ ला राजर्षी शाहू महाराज आणि रावबहादूर सी. के. बोले यांची संयुक्त जयंती कार्यक्रम होणार आहे.

हा कार्यक्रम कित्ते भंडारी सभागृहात होणार आहे. यामध्ये डॉ. श्रीरंग कद्रेकर मार्गदर्शन करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 27/Jun/2025

Ratnagiri Khabardar add image