रामपुरातील ग्रामस्थ महावितरण कार्यालयावर ३१ जुलै रोजी काढणार मोर्चा

चिपळूण : विरोधात महावितरणाच्या मार्गताम्हाणे कार्यालयावर ३१ जुलै रोजी रामपूर जिल्हा परिषद गटाच्या वतीने व पंचक्रोशीतील ग्राहकांच्या व शिवसेना उबाठा नेते, गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील काही महिन्यांपासून परिसरातील वीजबिलामध्ये अचानक वाढ झाली आहे ते वीजबिले चुकीचे व अवास्तव येत आहेत. वीजबिले ही नियमित वापराच्या तुलनेत कितीतरी पटींनी जास्त आहे. दरम्यान, महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकांना विश्वासात न घेता काही खासगी कंपनीमार्फत मीटर बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर व ग्राहकांच्या हिताविरोधात आहे. मीटर रीडिंगसाठी कोणीही येत नाही. मागील तीन महिने लाईट मीटरचे बिल घेण्यासाठी कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी आलेला नाही. त्यामुळे अंदाजे बिल पाठवून चुकीच्या प्रमाणात वसुली केली जात आहे या सर्व प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ३१ जुलै रोजी मार्गताम्हाणे येथे महावितरणच्या कार्यालयाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चामध्ये ग्रामस्थां महावितरण अधिकाऱ्यांकडे यावेळी वीज बिल पुन्हा तपासून ग्राहकाशी प्रत्यक्ष संपर्क करून सुधारित करावेत. ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणतेही नवीन मीटर बसवू नयेत. मीटर वाचन नियमितपणे करून त्याची माहिती ग्राहकाशी शेअर करावी. प्रायव्हेट कंपन्यांची नियुक्ती थांबवावी व सर्व कामे महावितरणमार्फत पारदर्शक पद्धतीने करावीत. या प्रकाराबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार आहेत, या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही, तर भविष्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी महावितरणवर राहील, असे युवा सेना उपतालुका अधिकारी प्रीतम वंजारे यांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 25/Jul/2025