कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी : कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मनोहर कृष्णा वारिशे (वय ५५, रा. कुवारबाव-रत्नागिरी, मूळ रा. कुवे, ता. लांजा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २७) सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोहर वारिशे हे मानसिक रुग्ण होते. १८ जुलैला ते घरातून निघून गेले होते. नातेवाइकांकडून त्यांचा शोध घेण्यात आला होता. मात्र, ते सापडले नाहीत. रविवारी सकाळी ते बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या कुवारबाव येथील घराशेजारी सापडले. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 28/Jul/2025

Shanti 4