लांजा विकास आराखडा रद्दसाठी मंत्री नीतेश राणेंना संघर्ष समितीचे साकडे

लांजा : येथील नगरपंचायतीच्यावतीने जाहीर केलेला आणि लोकांचा विरोध असलेला विकास आराखडा रद्द करावा, अशी मागणी लांजा-कुवे संघर्ष समितीतर्फे मत्स्य आणि बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

रविवारी (ता. २७) लांजा कुवे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथे राज्याचे मत्स्य आणि बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांची भेट घेतली. यावेळी नीतेश राणे यांनी लोकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. लोकांचा विरोध असेल तर विकास आराखडा रद्द केला जाईल. त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करीन, असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले आहे. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 28/Jul/2025