देवरुख : श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयात एक दिवसाचे साहित्य संमेलन

साडवली : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ ही जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांची शिखर संस्था आहे. संघाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, संघाने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे. त्यात प्रत्येक तालुक्यात एक दिवसाचे संमेलन होणार आहे.

संगमेश्वर तालुक्यातील संमेलन श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय देवरुख येथे होणार आहे. सध्या संगमेश्वर तालुक्यात वास्तव्यास सर्व साहित्यिकांनी स्वतःची माहिती श्री सद्‌गुरू लोकमान्य वाचनालयात पाठवावी, असे आवाहन अध्यक्षांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 28/Jul/2025

Shanti 4