पावस : कृषी प्रक्रिया व नियोजनचे संचालक विनयकुमार आवटे यांनी पावस, नाखरे आणि मावळंगे येथील विविध फळप्रक्रिया प्रकल्पांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांना मार्गदर्शनही केले.
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेतील अर्थसाह्य घेतलेला पावस येथील रामचंद्र देसाई यांचा फळप्रक्रिया (आंबा पल्प) प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतून अर्थसाह्य घेतलेला नाखरे येथील महादेव नरवणे यांचा आंबाप्रक्रिया प्रकल्प, मावळंगे येथील संतोष शिंदे यांच्या फळप्रक्रिया प्रकल्पांची पाहणी केली. आवटे यांनी प्रक्रिया उद्योगांच्या सद्यःस्थितीतील अडचणी समजावून घेऊन पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:26 PM 02/Aug/2025














