गुहागरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना घडली घटना; ३५ ग्रॅमच्या मंगळसूत्रासह सोन्याचे विविध दागिने चोरीला गेल्याने खळबळ
चिपळूण: Chiplun Bus Stand Theft ची एक खळबजनक घटना समोर आली असून, येथील भोगाळे एसटी स्थानकात गुहागरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या खांद्याला अडकवलेल्या पर्सची चेन उघडून तब्बल ५ लाख १७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोराने लांबवले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवानी सचिन गावडे (वय ३३, सद्य रा. बेडेकरनगर, दिवा, मुंबई; मूळ रा. शिरवली वेलोडेवाडी, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्याद शिवानी गावडे या १४ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास चिपळूणमधील मध्यवर्ती बसस्थानकात गुहागरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत एका चोराने त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्सची चेन अतिशय शिताफीने उघडली आणि पर्समधील दागिन्यांचे लहान पाकीट व इतर ऐवज चोरून पसार झाला.
चोरीला गेलेल्या दागिन्यांचा तपशील
चोरीला गेलेल्या ऐवजमध्ये तब्बल ५ लाख १७ हजार ५०० रुपये मूल्याच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. यामध्ये खालील दागिन्यांचा समावेश होतो:

१ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र
६० हजार रुपये किमतीचा १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा दागिना
प्रत्येकी २५ हजार व २० हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे झुमके
२५ हजार रुपये किमतीच्या कानातील सोन्याच्या पाट्या
३.५ ग्रॅम वजनाची अंगठी
५० हजार रुपये किमतीचा १० ग्रॅमचा सोन्याचा ऐवज
४५ हजार रुपये किमतीचा ९ ग्रॅमचा दागिना
प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व ब्रेसलेट
१५ हजार रुपये किमतीचे कर्णभूषण आणि ५ हजार रुपये किमतीचा १ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मणी
इतर मौल्यवान ऐवज आणि पांढऱ्या रंगाचे छोटे पाकीट
बसमध्ये चढल्यानंतर पर्सची चेन उघडी असल्याचे आणि आतील दागिने गायब असल्याचे लक्षात येताच गावडे यांना मोठा धक्का बसला. स्थानक परिसरात शोधाशोध करूनही चोराचा थांगपत्ता न लागल्याने त्यांनी शनिवारी रात्री ८.१५ वाजता चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा कसून शोध घेतला जात आहे.













