Ratnagiri : परतीसाठी १,९०० एसटी बसेसचे तिकीट ‘कन्फर्म’

रत्नागिरी : गणेशोत्सवानंतर कोकणवासीयांना परतीचे वेध लागत असते. त्यामुळे कोकणकरांचा प्रवास सुखकर, चांगला व्हावा यासाठी रत्नागिरी विभागातून २ हजार ५०० बसेसची सोय केली आहे. आरक्षणास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत तब्बल १९०० एसटी बसेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. काहींचे एसटीचे आरक्षण शिल्लक आहे. लवकरात लवकर ऑनलाईन आरक्षण करून तिकीट बुक करण्याचे आवाहन एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबई, पुणेसह अन्य शहरातील कोकणवासीय आपल्या मुळ गावी एसटी, रेल्वे, खासगी बसेस, चारचाकीने येत आहे. त्यामुळे कोकणातील गावे गजबजू लागली आहे. मुंबईतून तब्बल ५ हजार २०० एसटी बसेसची सोय एसटी महामंडळांनी केली आहे. दरम्यान, दहा दिवस गणेशोत्सवानंतर कोकणवासीयांना मुंबई, पुणेसह अन्य शहरात जाण्यासाठी लगबग असते. परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागाकडून तब्बल २ हजार ५०० एसटी बसेसची सोय करण्यात आली असून २२ जुलै पासून ऑनलाईन आरक्षणास सुरूवात झाली. परतीच्या प्रवासास प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत तब्बल १ हजार ९०० एसटी बसेस बुकींग झाले आहे. उर्वरित बुकींग करण्यासाठी कोकणवासीयांनी अॅपवरून किंवा महामंडळाच्या वेबसाईटवरून तिकीट बुकींग करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रुप बुकींग तसेच विविध प्रवाशांनी तिकीटे बुकिंग केली आहेत. ज्यांनी तिकीट बुक केले नाही. त्यांनी वेबसाईट, अॅपवरून ऑनलाईन तिकीट बुकिंग करावे-प्रज्ञेश बोरसे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी

सवलतीचा घ्या लाभ
गणेशोत्सवात कोकणवासियांसाठी ७५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर ६५ वर्षावरील वयोवृध्द, महिलांसाठी ५० टक्के सवलत असणार आहे. तरी या सवलतीचा लाभघ्यावा तसेच ऑनलाईन तिकिटावर १५ टक्के सूट सवलत धारक वगळून सर्व पुरुषांना मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 28-Aug-25