Ratnagiri : आयुष्मान भारत योजनेंतर्गत ७ सप्टेंबरपर्यंत कार्ड काढण्यासाठी मुदत

रत्नागिरी : जिल्ह्यात आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी ई-केवायसी मोहीम राबवली जात आहे. लाभार्थी स्वताच्या मोबाइलवरदेखील आयुष्मान अॅप डाउनलोड करून ई-केवायसी करू शकतात. जिल्ह्यातील लाभार्थीना याचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत.

एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १ हजार ३५६ उपचार व शस्त्रकियेसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये पाच लाख आरोग्य संरक्षण व २ हजार ३०० पेक्षा जास्त शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेता येतात. आयुष्यमान वय वंदना योजनेंतर्गत ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त पाच लाख रुपये लाभ दिला जातो.

https://beneficiary.nhea.gov.i n या पोर्टल / अॅपवर लॉगिन करून स्वतः आपले आयुष्यमान कार्ड तयार करता येते. जिल्ह्यात १६,५७,६६५ या योजनेचे संभाव्य लाभार्थी आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६,१६,४०७ जणांनी ई केवायसी केली आहे. यासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

आयुष्मान कार्ड अॅप किंवा पोर्टलवरही काढता येणार
आयुष्मान कार्ड आपण स्वतः मोबाइलवर आयुष्मान अॅपद्वारे काढू शकतो. किंवा https://beneficiary.nhea.gov.in या पोर्टलवरही काढता येते. तसेच आपले सरकार सेवा केंद्र, आशासेविका यांच्या मदतीनेही काढून मिळते.

१० लाख जणांची ई-केवायसी
एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत आता ७० वर्षांवरील व्यक्तींसाठी अतिरिक्त पाच लाख रुपयांपर्यंत उपचाराचा लाभ दिला जाणार आहे. यो, यासाठी ईकेवायसी अनिवार्य आहे. अजूनहीं दहा लाख जणांची ई-केवायसी बाकी आहे.

आयुष्मान योजनेसाठी कोणती कागदपत्रे हवीत

आयुष्मान भारत योजनेसाठी कार्ड बनविण्यासाठी अद्ययावत शिधापत्रिवार, आधार कार्ड आणि आधार क्रमांकाला जोडलेला नोंदणीकृत मोबाईल नंबर या बाबीं महत्वाच्या असतात.

५ लाखांपर्यंत मोफत उपचार
एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व वय वंदना कार्ड योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत उपचार नागरिकांना मोफत मिळणार आहेत,

जिल्ह्यात विशेष अभियान राबविण्यात येणार
आयुष्मान योजनेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविली जाणार आहेत. यात आपले सरकार सेवा केंद्र, आशासेविका, स्वस्त धान्य दुकान चालक, आरोग्यमित्र, सरपंच, ग्रामपातळीवरील शासकीय अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ स्वयंसेवी संस्था यांचाही सहभाग राहणार आहे.

आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड काढणे गरजे आहे. यासाठी ७ सप्टेंबरपर्य मुदत आहे. हे कार्ड मोबाईल आयुष्मान अॅप डाऊनलोड करा किंवा शासनाच्या अधिकृत https://beneficiary.nh ov.in या पोर्टलवरही तयार करता येईल. आपले सरकार सेवा केंद्र, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्याक कार्ड काढता येईल. नागरिव लाभ घेऊन मुदतीपुर्वी आयुष्य कार्ड काढून घ्यावे- डॉ. प्रविण गोरूले, जिल्हा समन्वय रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 03-Sep-2025