Ratnagiri : पावसामुळे साथीचे आजार बळवले

दापोली : उसंत घेतलेल्या पावसाने दापोलीत पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. मागील पंधरवड्यात मुसळधार पडलेल्या पावसाने नागरिक सर्दी पडशाने हैराण आहेत. त्यात आणखी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्यामुळे आणखी साथीचे आजार बळवणार अशी शक्यता दिसत आहे.

दापोलीत शुक्रवारी दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे दापोली तालुक्यातील आरोग्य यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. दापोलीत मोठ्या प्रमाणात कोकणवासीय मंडळी गणेशोत्सव सणासाठी आली आहे.

या सर्व कोकणकर मंडळींची आरोग्य विभागाकडून त्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून ठिकठिकाणी कर्मचारी सेवा बजावत आहेत. मात्र नागरिकांनी आपल्या आरोग्याची खबरदारी घेत, काही आरोग्य विषयी समस्या असेल तर जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

गणेशभक्तांच्या उत्साहावर पावसाचे विरजण
गणेशोत्सव सणावर पावसाचे गडद सावट असून, या पावसामुळे स्थानिक भक्तांच्या आणि गणेशोत्सवासाठी आलेल्या कोकणकर मंडळींच्या हौसेवर पावसामुळे विरजण पडले आहे. दोन तारखेला सात दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे मात्र पाऊस असाच पडत राहिला तर गणेश उत्सवाची सगळीच मजा निघून जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:38 PM 01-Sep-2025